Thursday 23 November 2017

दुध- एक तापवणे (विडंबन)

आच जरा मंद आहे, दर वेळी वाटतं..
गॅस वाढवला की सायीचं टेंशन मनात दाटतं!!
तरी मन मानत नाही, गॅस मोठा होतो..
आता प्रत्येक क्षण कसा उफाळलेला वाटतो!!
तितक्यात कुठुन एक कॉल मोबाइल वर येतो,
दुधामधलं आपलं लक्ष स्वत:कडे वेधतो!!
बोलणारा बांध फोडून गप्पा आपल्या सुरू करतो..
आपण मात्र एक डोळा दुधाकडे ठेवून असतो!!
टप्प्या-टप्प्याने हळूहळू दुध वर येऊ लागते..
आणि त्याच क्षणी समोरच्याला जोक करायची हुक्की येते!!
चक्क डोळ्यांसमोर भळाभळा दुध ऊतु जातं..
असं दुध तापवत असतानाच कुणी कॉल का बरं करतं!!

- © स्वाती अत्रे